top of page

उगम फाऊंडेशन डोंबिवली च्या वतीने बालपण स्कूल पानोडी येथे १०० झाडांचे वृक्षारोपण...
बालपण स्कूल पानोडी येथे उगम फाऊंडेशन डोंबिवली, मुंबई ची संपूर्ण टिम एकत्र येत शाळेच्या आवारात झाडांचे शतक शंभर झाडांचे वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल पथकांनी त्यांचे स्वागत केले.  वृक्ष दिंडी काढत  वृक्षारोपन करून पर्यावरण रक्षणाची ची शपथ घेतली. उगम फाऊंडेशन चे अध्यक्ष संकेत तांबे,  सचिव वैभव रत्नपारखी, खजिनदार स्वप्निल तांबे,  सदस्य सदाशिव पालव, कृष्णा परब यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. संकेत तांबे यांनी  संस्थेच्या कार्याविषयी माहिती विषद केली. शाळेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.

उगमफाऊंडेशन तर्फे  8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त
डोंबिवली स्थानक (प्लॅटफॉर्म नंबर 1 - मच्छी मार्केट टिकेट खिड़की जवळ), मोफत सेनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले.

उगमफाऊंडेशन तर्फे  दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी, आधारतीर्थ आश्रम शाळा, नाशिक येथे 
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी  मिठाई आणि फटाके वाटप करण्यात आले.

५ सप्टेंबर २०२१ शिक्षकदिनानिमित्त प्राथमिक आश्रम शाळा काचुर्ली ता. त्रंबक, जिल्हा नाशिक येथे लहान मुलांसाठी डिजिटल पाट्या, पुस्तक, कलर इत्यादी गोष्टींचे वाटप करण्यात आले.

उगम फाउंडेशन तर्फे कु. आम्रपाली नायर ह्यांच्या जन्म दिवसा निम्मिताने तसेच त्यांच्या स्मरणार्थ, नाशिक - पेठ येथील म.वि.प्र. अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना सस्नेह भोजन आयोजित करण्यात आले. तेथील विद्यार्थिनींना कु. आम्रपाली नायर ह्यांच्या कुटुंबाच्या वतीने १०० रजई, ५० कलर पॅकेट तसेच अन्य उपयोगी अश्या वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले, त्या प्रसंगी तेथील मुलींनी
कु. आम्रपाली नायर हिस श्रद्धांजली वाहिली.

महाड येथील पुरग्रस्थानां उगम फाऊंडेशन तर्फे आर्थिक मदत 

शनिवार दि. ०७/०८/२०२१ रोजी उगम फाउंडेशन तर्फे महाड शहरातील ज्यांची घरे वाहून गेले आहेत अश्या कुटुंबांना तसेच आसनपोई, बौद्धवाडी, तळई गाव, व काही आदिवासी भागांमध्ये एकूण मिळून ७० कुटुंबाना प्रत्येकी ५०००/- रुपयांचा धनादेश देण्यात आले.
प्रसंगी संस्थेचं अध्यक्ष संकेत तांबे, उपाध्यक्ष वैशाली म्हात्रे, सचिव वैभव रत्नपारखी, खजिनदार स्वप्नील तांबे आणि सभासद मधुरा रत्नपारखी

व रोहित नाईक उपस्थित होते. ह्या सर्व गावांमध्ये नेमकी आर्थिक मदत कुठे कुठे देणे आहे, तसेच कोणाला जास्त गरज आहे ह्या साठी तेथील स्थानिक समाजसेवक प्रतीक रहाटे साहेब आणि गायकवाड साहेब ह्यांनी ह्या कार्यात उगम फाउंडेशन ला मदत केल्या बद्दल

फाउंडेशनच्या मेंबर्स ने त्यांचे मानले आभार.

Donated 50 school bags in Shrivardhan (Raigad)

Distribution of Water Purifier and Sports Material

 

नाशिक पेठ येथील एम.वि.पी अनुदानित आश्रम शाळेत उगम नामक डोंबिवली येथील सामाजिक संस्थेने दि.२६ जून २०२१ रोजी तेथील विध्यार्थ्यांना साठी वॉटर प्युरीफायर, क्रिकेटचे चे साहित्य, बॅट मिनीटन चे साहित्य तसेच कॅरम, बुद्धिबळ आणि फुटबॉल उपलब्ध करून दिले. 
येथील विद्यार्थ्यांनी तसेच शाळेतील प्राध्यापक आणि शिक्षकांनी उगम नामक संस्थेचे मानले खूप खूप आभार.
ह्या आधी देखील जागतिक महिला दीना निमित्ताने उगम संस्थेने सदर शाळेतील ६५० विद्यार्थिनींना वर्षभर पुरतील असे उत्तम दर्जाचे सॅनिटरी पॅड चे वाटप केले होते, त्या सोबत त्यांना सॅनिटीझर, मास्क आणि वह्यांचे देखील वाटप करण्यात आले होते.
आत्ता पर्यंत उगम संस्थेने शाळेसाठी केलेल्या भरपूर मदतीमुळे शाळेतर्फे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
ह्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.संकेत तांबे, उपाध्यक्ष सौ. वैशाली म्हात्रे, सचिव श्री. वैभव रत्नपारखी, खजिनदार श्री. स्वप्नील तांबे, सभासद सौ.मधुरा रत्नपारखी आणि रोहित नाईक तसेच प्राध्यापक पाटील सर आणि इतर शिक्षक उपस्थित होते.

उगम (डोंबिवली) या सामाजिक संस्था व कर्जत माथेरान पोलिसांच्या वतीने येथील अश्व चालकांना व येथील माकडांना खाद्य वाटप कर्जतचे डी. वाय. एस. पी. श्री. अनिल घेरडीकर यांच्या हस्ते माथेरानमध्ये वाटप करण्यात आले.

Help for Santgaon Flood Victims

Help for Flood Victims

Distribution of Grains and Clothes

 

Ugam Foundation distributed grain and clothing to Bhospaada (tribal pada) near Khardi village in Shahapur taluka. To implement this program, We got many help from Rajendra Kashinath Nikam and former patriot Ananta Rose.

In addition to the joy of the tribals and the faces of the brothers, we got the urge to implement something new for them.

Sanitary Napkin Donation Camp

 

A little effort!

On 24/02/2019, Sanitary Napkin, Grains and Clothes were distributed to 50 women by Mokhyacha Pada, Pardhi Pada, Ghatkan Pada (Tribal Peoples) by Ugam Foundation. To get this program, we received many support from Madhura Ratnaparkhi, Bharti Rajendra Nikam, and thanked teacher Nilesh Devkar for this.

Seeing the joy of the faces of these sisters, we received a receipt for the effort.

bottom of page